इंजिनीअरिंग, मेडिकल राज्य प्रवेश प्रक्रिया कक्षातर्फे सर्व प्रणाली ऑनलाइन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई
:  प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इंजिनीअरिंग किंवा मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे, कागदपत्रे सादर करणे यामध्ये विद्यार्थ्यांचा भरपूवर वेळ व पैसा खर्च होतो. हे सर्व टाळण्यासाठी आता राज्य प्रवेश प्रक्रिया कक्षातर्फे सर्व प्रणाली ऑनलाइन करण्यात येणार असून कागदपत्र छाननीपासून शुल्क भरण्याची सर्व प्रक्रिया सुलभ होणार आहे. यासाठी जिल्हा स्तरावर सेतू केंद्र उभारण्याचा विचार अंतिम टप्प्यात आहे. याचा फायदा लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे. 
प्रवेश परीक्षा कक्षामार्फत होणाऱ्या इंजिनीअरिंग, मेडिकल, कृषी, मत्स्यविज्ञान, नर्सिंग, फाइन आर्ट्स, आयुष अशा अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशाने कक्षाने ऑनलाइन प्रणाली तयार केली आहे. २०१९-२०चे प्रवेश या नवीन 'सफलता' प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक सेतू केंद्र उभारले जाणार आहे. उच्च दर्जाची इंटरनेट क्षमता आणि इतर सोयीसुविधांनी ही सेतू केंद्रे विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सज्ज असतील.   Print


News - Rajy | Posted : 2019-01-14


Related Photos