महत्वाच्या बातम्या

 मिनघरी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन 


- आमचा गाव-आमचा विकास समिती मिनघरी व सेवा फाऊंडेशन नागपूर यांच्या वतीने आयोजित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : आमचा गाव-आमचा विकास समिती मिनघरी व सेवा फाऊंडेशन नागपूर यांच्या वतिने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे 2023 सोमवारला जि.प.उच्च प्राथ.शाळा मिनघरी येथे सकाळी 11.वाजता रक्तदान शिबिराचे  आयोजन केले आहे. 

उन्हाळाच्या दिवसात रुग्णाच्या वाढत्या रक्ताची मागणी व त्या प्रमाणात उन्हामुळे वेळेवर रक्तदात्यांना रक्तदानास येतांना होणारा त्रास लक्षात घेऊन, शासकीय रक्तपेढीत रक्ताचा नियमीत साठा असावा, या उद्देशाने आमचा गाव-आमचा विकास समिती मिनघरी व सेवा फाऊंडेशन नागपूर यांच्या वतिने रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. तरी परिसरातील रक्तदात्यांनी या शिबीरात रक्तदान करुन सहभागी व्हावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos