सलग चौथ्या दिवशी पेट्रोल , डिझेलची दरवाढ


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  आज १३  जानेवारी रोजी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल , डिझेल ची दरवाढ करत तेल कंपन्यांनी  धक्का दिला आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलिटर ४९ पैसे तर डिझेल ५९ पैशांची वाढ झाली. तर मुंबईत पेट्रोल ४८ पैसे आणि डिझेल ५९ पैशांनी महाग झालं. प्रतिलिटर ४८ पैशांची वाढ झाल्याने मुंबईत आता एक लिटर पेट्रोलसाठी ७५.३९  रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेलसाठी प्रतिलिटर ६६.६६ रुपये मोजावे लागतील.
दुसरीकडे दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल ६९.७५  रुपये प्रतिलिटर झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये नव्या वर्षात झालेल्या या मोठ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. पण आठवड्याच्या शेवटी ही दरवाढ थांबली असतानाही भारतातील पेट्रोल - डिझेलच्या किंमतींवरील त्याचा परिणाम कमी झालेला नाही. दरम्यान, लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.



  Print






News - World | Posted : 2019-01-13






Related Photos