महत्वाच्या बातम्या

  सामाजिक वनीकरण विभागाच्या चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : सामाजिक वनीकरण विभागाच्या विविध योजनेच्या चित्ररथाचे २५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व उपवनसंरक्षक वनविभाग राहुल गवई, विभागीय वन अधिकारी संदीप क्षीरसागर यांनी हिरवी झेंडी दाखवीली.

भाजी मंडी बाजार येथे प्रदर्शनी व चित्ररथाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पडीक जमिनीवर बांधावर बांबू शेती, मोहगणी, साग व इतर फळवृक्ष रोपे तसेच कृषी विभागाच्या वतीने चार सुत्री भात लागवड, भाजीपाला पाचट, खत व्यवस्थापन अनुदानावर आधारित ट्रॅक्टर, रोटावेटर, मळणी यंत्र, शेततळे, विहीर, तुती रेशीम लागवड, तंत्रज्ञान व व्यवस्थापन व फायदे तसेच शासकीय योजनांची माहिती देणारे माहिती व चित्र प्रात्यक्षिक प्रोजेक्ट द्वारे दाखविण्यात आले.

मोहाडी येथे तहसील कार्यालय परिसरात तुमसर तालुक्यात खापा, बसस्थानक बाजार चौकात ग्रामीणमध्ये देवाडी, माडगी पालोरा, साकोली तालुक्यात एकोडी, सानगडी व लाखांदूर तालुक्यातील दिघोरी व लाखांदूर पवनी तालुक्यातील आसगाव, कोंढा, कोसरा, अड्याळ व भंडारा तालुका येथील पहिला येथे चौकात चित्ररथ प्रदर्शनी व प्रत्यक्ष प्रोजेक्ट व मार्गदर्शन करून सामाजिक वनीकरणाच्या कन्या वनसमृद्धी योजना रा.म.ग्रा. रोजगार हमी योजना व वनश्री पुरस्कार योजना अशा अनेक योजनांची माहिती देण्यात आली.

२५ व २६ एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात चित्ररथ फिरवण्यात आले. या चित्ररथा सोबतच वनश्री पुरस्कार प्राप्त शाहीर कार्तिक मेश्राम यांनी स्वयंलिखित पर्यावरण गीत सादर करून शेतकऱ्यांना वनीकरणाच्या योजनेची माहिती दिली. भंडारा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक मोहाडीचे गेडाम, तुमसरचे धनविजय, साकोलीचे बेलखोडे व पवनीचे रिजवी यांनी मार्गदर्शन केले.





  Print






News - Bhandara




Related Photos