महत्वाच्या बातम्या

 बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाऱ्यांवर कारवाई : ४० हजार रुपयांचा दंड वसूल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने ५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
लक्ष्मीनगर झोन आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकल्या संदर्भात ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.


उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत गणेश किराणा स्टोअर्सवर प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करण्यासाठी कारवाई करून ५, ००० चा दंड वसूल केला आणि २ किलो प्लास्टिक जब्त केले. तर धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या पार्वतीनगर येथील बुलेट बार अँड रेस्टोरंट यांच्यावर कचऱ्याचे विलगीकरण नकरणे व अस्वच्छ स्वयंपाकगृह असल्याबाबत कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच लक्ष्मीनगर झोन येथील सतीश एन्क्लेव्ह, कन्नमवार नगर, वर्धा रोड येथे बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवल्यामुळे १० हजार रुपयांचा दंड केला.
मंगळवारी झोन अंतर्गत शंभूनगर कोराडी येथील झील पाव्हर्स अँड टाईल्स यांच्याविरुद्ध बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकल्यामुळे त्यांच्यावर १० हजाराचा दंड केला तसेच विशाल भसीन यांच्यावर बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवल्यामुळे ५ हजाराचा दंड वसूल केला.





  Print






News - Nagpur




Related Photos