श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ यांची जयंती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा :
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून व राजमाता जिजाऊ यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. 
  कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी   महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. खेरानी होते. प्रमुख अतिथी म्हणून  जि. प. सदस्य  मेघाताई नलगे  चंद्रपूर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. व्यंकटरमना, डॉ. राजेंद्र मुद्दमवार, डॉ. संजय लाटेलवार, प्रा. सुरेंद्र बोरडे उपस्थित होते. तसेच ग्रंथपाल डॉ. सारिका साबळे, इतिहास विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास डी. बल्की उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रा. व्यंकटरमना यांनी स्वामीजींचे विचार, तत्वज्ञान यावर प्रकाश टाकताना भारतीय युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून क्रियाशील असावे असे तरुणांना आवाहन केले.
त्याचबरोबर डॉ. मुद्दमवार यांनी युवकांनी सतत क्रियाशील राहून देशाचे नेतृत्व करायला पाहिजे असे सांगितले,  मेघाताई नलगे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.  तसेच युवकांनी जिद्दीने आणि विश्वासाने कार्य करायला हवे असे प्रतिपादन केले.  जिजाऊंनी छत्रपती घडविला असे प्रतिपादन डॉ. लाटेलवार यांनी सांगितले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. खेरानी यांनी विवेकानंद यांच्या शिकागो परिषदेतील भाषणाचा उल्लेख करत या भाषणाने जागतिक स्तरावर देशाची मान उंचावल्या गेली असे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले सांगितले.  या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी व रासेयो स्वयंसेवक, प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे संचालन प्रा. गुरुदास बल्की यांनी केले  व  आभार विशाल शेंडे यांनी मानले.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-12


Related Photos