देवराई आर्ट व्हिलेज कडून कोयनगुडा शाळेला होम थिएटर भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
देवराई आर्ट व्हिलेज भामरागड चे संपादक  सुरेश  पुंगाटी हे मूळचे कोयनगुड येथील रहिवासी आहे. परंतु सध्या ते सातारा (पाचमनी ) येथे स्थायिक झालेले आहे. बाहेरगावी राहूनही आपल्या गावाशी त्यांची नातं जुळलेले आहे. कोयनगुड जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांची नृत्याची आवड लक्षात घेऊन त्यांनी चांगल्या दर्जाचे मोठे होम  थिएटर शाळेला भेट म्हणून दिले व यापुढेही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले. 
  यावेळी शाळा समितेचे अध्यक्ष  संतोष  हबका,  मुख्याध्यापक   विनीत पदमावार , सहशिक्षक  वसंत इष्टम  सर्व गावकरी व विध्यार्थी उपस्थित होते . सुरेश  पुंगाटी याचे सर्वांनी आभार मानले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos