बिझीनेस आयडिया कॅन्टेस्ट चे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
तरुणांमध्ये उद्योगाची आवड वाढावी आणि उद्योग करण्याची प्रेरणा मिळावी या साठी भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या उद्योजक घडविण्यास सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या संस्थेने वर्धा जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते ‘बिझीनेस आयडिया कॅन्टेस्ट’ (बीआयसी) (उद्योग संकल्पना स्पर्धा) चे शनिवारला विकास भवन येथे उद्घाटन केले. 
ही स्पर्धा १ मार्च पर्यंत चालणार आहे. भारतीय युवा शक्ती ट्रस्ट हि बजाज ऑटो च्या अंतर्गत वर्धा जिल्यात मागील ३ वर्षापासून विविध क्षेत्रात उद्योजक घडविण्यासाठी कार्यरत असून युवा उद्योजकता विकास कार्यक्रम राबवत आहे. या संस्थेचा उद्देश “ नोकरी मागणार्यांना नोकरी देणारे बनविणे” तसेच वर्धा येथील युवक- युवती मध्ये उद्योजकते विषयी जागरूकता वाढविणे आणि उद्योजक बनण्याची प्रेरणा रुजवणे आहे. आज पर्यत २०० हून अधिक उद्योजकांना सहकार्य करुन सक्षम केलेलं आहे. याचाच एक भाग म्हणून आज पासून १ मार्च २०१९ पर्यंत वर्धा जिल्यात ‘बिझीनेस आयडिया कॅन्टेस्ट’ अशी अभिनव अद्वितीय संकल्पना राबवून तरुराना अद्योजक्ते कडे आकर्षित करून त्यांचा उद्योग करण्याची प्रेरणा मिळावी या साठी जिल्यातील १८ ते ३५ वयोगटातील व्यक्ती ने सहभागी होण्याचे आव्हान केले आहे. आणि प्रथम येणाऱ्या आयडिया ला ५०००० चे बक्षीस ठेवले आहे. तर यात खऱ्या अर्थाने नाविन्यपूर्ण असणाऱ्या आयडिया ला साकार करण्यासाठी भांडवलासह इतर सहाय केले जाणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने, तर बँक आफ इडिया चे विभागीय व्यवस्थापक पी बुरांडे, जे बी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ओम महोदय, जिल्हा व्यवसाय अधिकारी यु आर खरोडे, ग्राम उपयोगी विकास केंद्र चे सोहम पंड्या आदी मान्यवर उपस्थित होते. अतिरीक्स्त जिल्हाधिकारी दैने म्हणाले, ‘नाविन्य पूर्ण संकल्पना असेल तर तो उद्योजक यशस्वी होतोच तर नवीन उद्योजकाने सदैव नाविन्य पूर्ण संकल्पना साकार करायला हवी, कोणाचा व्यवसाय चांगला चालतो म्हणून त्याची नकल करण्याचा प्रयत्न केला तर तो उद्योजक यशस्वी होवू शकत नाही. वर्धा सारख्या जिल्ह्याला लाभलेलं भाग्य आहे कि विना मूल्य उद्योजकांना सर्वोतोपरी सहकार्य करणाऱ्या संस्था ह्या जिल्ह्यात आहे आणि अशी संस्था इतर कुठेही पाहायला मिळत नाही, याचा वर्धेतील युवकाने लाभ घ्यायला पाहिजे’.   
जिल्यातील सगळ्या बँकच्या परिसरामध्ये बीआयसी ची पेटी ठेवलेली असेल तिथे जिल्यातील संबधित वायोगातील कोणताही व्यक्ती आपली आयडिया त्या पेटीत १ मार्च पर्यंत टाकू शकतो आणि स्पर्धेत भाग घेवू शकतो. स्पर्धेत भाग घेणार्यांना ३ प्रकारचे बक्षीस दिले जातील आणि बाकी सर्धाकाना प्रमाणपत्र दिले जाईल तथा नाविन्यपूर्ण आयडिया ला प्राधान्याने साकार करण्यासाठी बँक कडून कर्ज आणि इतर मदत केले जाईल. संकल्पना मांडताना भारतीय युवा शक्ती ट्रस्ट चे सचिन जोशी म्हणले, देशात तरुणानजवळ खूप आयडिया आहेत ज्या खर्याअर्थाने नाविन्यपूर्ण आहे पण तसे वातावरण मिळाले नाही तर अश्या आयडिया कुंठल्या जातात त्याला वाव मिळत नाही आणि घडणारा उद्योजक समाज त्याला मुकतो, हि संकल्पना आम्ही त्यासाठीच आणली आहे कि ज्यांना आर्थिक पाठबळ नाही पण उत्कृष्ट नाविन्यपूर्ण आयडिया आहे त्या व्यक्तीला सर्व प्रकारे सहायकरून उद्योजक घडविण्याचा पर्यंत केला जाईल. असे ते म्हणाले.

‘उद्योग एक्सप्रेस’ ला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले, हि उद्योग एक्सप्रेस गावागावात जावून जनजागृती करेल आणि तरुणांना व्यावसायिक संकल्पनेचा विचार करण्यास प्रोत्साहन करेन आणि यात सहभागी करेल. या यात्रेद्वारे जिल्यात विविध ठिकाणी जागृती अभियान आयोजित करण्यात येतील आणि त्या द्वारे युवक युवतींच्या व्यवसाहिक संकल्पनेचे संकलन केले जाईल, या व्यावसायिक संकल्पनेची नाविन्यता, नवसंकल्पना आणि व्यवहार्यता या निकषावर तज्ञ व्यावसायिकाच्या समितीद्वारे छाननी आणि परीक्षण केले जाईल. अश्या संकल्पना यशस्वी आणि प्रगतीशील उद्यागामध्ये रुपांतरीत केले जाईल. वर्धा जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, बँक शाखा, प्रशिक्षण केंद्रे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविला जाईल.   

कार्यक्रमाला जिल्यातील ४०० हून अधिक तरुणांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे संचालन सचिन घोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर पांगुळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी राकेश कदम, संदेश राउत, अना सोरते, दत्ता गावडे, आणि संपूर्ण भारतीय युवा शक्ती ट्रस्ट ने सहकार्य केले.   Print


News - Wardha | Posted : 2019-01-12


Related Photos