राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करा : प्रा. डॉ. भारत पांडे


- समाजशास्त्र विभागाचा अभिनव उपक्रम 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी :
  युवकांनी राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी ठेवावी. तेव्हाच भारत माता विश्वगुरू बनल्याशिवाय  राहणार नाही.  म्हणून युवकांनी दुसऱ्याची नक्कल , कॉपी, न करता स्वतःचे अस्तित्व ओळखून उद्देश प्राप्त करण्यासाठी यश  प्राप्त होते तो पर्यंत प्रयत्न करावे असे आवाहन समाजशास्त्र विभाग प्रमुख  प्रा.डॉ  भारत पांडे  यांनी   केले. 
 महात्मा ज्योतिबा फुले  महाविद्यालयाचे  प्राचार्य संजय फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभागाद्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  ते शिवाजी महाराज जयंती पर्यंत सेवा प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पाद्वारे सेवा वस्तीला भेट देणे, स्वच्छता अभियान, कलापथकाद्वारे ,अंधश्रद्धा , हुंडा, व्यसनमुक्ती बाबत जनजागृती , एक पेन,एक बुक, जुने कपडे गोळा  करणे अशा विविध  उपयोगी कार्यक्रमाद्वारे युवकांना  समाजाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येते. 
 या सेवा प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रा. डॉ. रवी शास्त्रकार , प्रा. डॉ. गणेश खुणे, प्रा.डॉ तुला, प्रा. डॉ . राज मुसणे, प्रा. श्याम कोरडे, प्रा. ज्योती बोबाटे, प्रा.सालूलकर यांनी मार्गदर्शन केले.   कीर्ती    पेंदोर,  विश्वजित हलधर, अमोल बोरकुटे, प्रफुल नारनवरे , प्रणव मंडल  या युवकांनी मनोगत व्यक्त केले. 
 कार्यक्रमाचे संचालन प्रा. नाशिका  गभणे  , प्रास्ताविक सारिका मंडल हिने केले तर शिवानी उशारकर अंजली कातका, अश्वीनी दिवसे, ज्योती  , बुलबूल बैद्य , सपना बैरागी यांनी गीते सादर केली.  आभार कैमुदी श्रीरामवार यांनी मानले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos