महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली : भारतीय मजदूर संघाचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर २६ एप्रिल २०२३ रोजी भारतीय मजदूर संघ जिल्हा गडचिरोली तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. 

सदर आंदोलनामध्ये सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात यावी, कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्याला कामातून कमी करू नये, केंद्र सरकार नवीन श्रमनिधी तयार करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आले.

यावेळी मागण्याकरिता भारतीय मजदूर संघ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने केंद्र व प्रदेशाच्या निर्देशानुसार व पटना अधिवेशनात पारित झालेल्या ठरावाची प्रत गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. मीना यांना निवेदन देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविण्याबाबत सुचीत करण्यात आले आहे. 

याप्रसंगी भारतीय मजदूर संघाचे जिल्हा प्रभारी हेमराज गेडे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष विकास कामेवार, जिल्हा मंत्री मनोज पडिशालवार, मंत्री मंजीत गोस्वामी, पदाधिकारी गजानन चौधरी, तुषार गुरनुले, महिला प्रतिनिधी मेघा रायपुरे तसेच असंख्य महिला व कामगार उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos