चंद्रपूर आगारा समोर सुरु असलेल्या एस. टी. कर्मचारी काँग्रेसच्या आमरण उपोषणाची सांगता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपुर : 
महाराष्ट्र एस. टी.कर्मचारी काँग्रेसच्या वतीने कामगारांच्या मागण्यासाठी एस .टी. बसस्थानक चंद्रपूर आगार समोर संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत काकड़े व कार्याध्यक्ष विजय बोरगमवार यांनी आमरण उपोषण प्रारंभ केले होते . दुसऱ्या दिवशी एस. टी. प्रशासना तर्फ़े कॉंग्रेसच्या  पदाधीकाऱ्याना आमंत्रित करून विभाग नियंत्रक  आर. एन. पाटिल , कामगार अधिकारी पराग शंभरकर ,सुरक्षा अधिकारी कानफाडे  यांच्याशी कर्मचारी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष मंगेश डांगे ,विभागीय अध्यक्ष राजेश सोलापन, विभागीय सचिव गणेश सिंग बैस यांच्याशी यशस्वी बोलणी करून मागणी मंजूर केल्याबद्दल सदर आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.
 राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रतिमेला माल्यार्पण करुण दुपारी १२  वाजता उपोषणाला  प्रारंभ करण्यात आला.  मंडपात आमरण उपोषणाला बसलेले संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत काकडे ,कार्याध्यक्ष विजय बोरगमवार यांना विभाग नियंत्रक आर.एन. पाटील  राज्य परिवहन चंद्रपुर विभाग यांनी लिंबू पाणी देऊन उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली.
 आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी  सहनभूतीपूर्ण विचार करून उपोषणाची सांगता करण्यात आली .या बद्दल एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांना व  परिवहन मंत्री रावते, संघटनेचे अध्यक्ष आमदार भाई जगताप , सरचिटणीस श्रीरंग बरगे , पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार ,उप महाव्यवथापक नियंत्रण समिती पंचभाई यांचे मनापासून आभार मानले आहे.
यावेळी  महाराष्ट्र एस. टी.कर्मचारी काँग्रेस चे राज्यउपाध्यक्ष  मंगेश डांगे ,विभागीय अध्यक्ष राजेश सोलापन, विभागीय सचिव गणेशसिंग बैस  ,उपाध्यक्ष मोतीसिंग चव्हाण  ,रामा राठोड फिरोज पठाण कोषाध्यक्ष ,जागेश्वर बहादूरे सहसचिव ,संजय ठेंगणे , राकेश चौधरी , रवी पिसे ,सतिश महाजन व बहुसंख्य कामगार उपस्थित होते .
   Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-12


Related Photos