भामरागड तालुक्यातील कोयनगुंडा शाळेला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची आकस्मिक भेट


-  जिल्हाधिकाऱ्यांनी केले शाळेचे कौतुक 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोयनगुंडा येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज १२ जानेवारी रोजी आकस्मिक भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेतील उपक्रम व विद्यार्थ्यांची बुद्धिमता तपासून जिल्हाधिकाऱ्यांनी या शाळेचे कौतुक केले . 
भेटी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास बघितला, इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनीनं २७ चा पाढा म्हणून दाखविला , भाषेच्या विषयासह गणितात सुद्धा  उत्तम प्रतिसाद , विद्यार्थ्यांना वाचनाची आवड असून वाचनालयात स्वतः पुस्तकांची नोंद करतात , विद्यार्थ्यांचे गायन व नृत्य उत्कृष्ट , शाळेचा नावीन्य उपक्रम दप्तर मुक्त शनिवार, विद्यार्थी कुपन योजना , बचत बँक , क्षेत्रभेट आदी सर्व उपक्रमांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक विनीत पद्मावार , सहशिक्षक वसंत ईष्टम व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष हबका  यांनी शाळेसाठी व गावासाठी केलेल्या कार्याचे देखील कौतुक करीत शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मैदानाकरिता ७ लक्ष रुपये व शाळेची संपूर्ण दुरुस्ती करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले . 
यावेळी तहसीलदार कैलास अंडील , नायब तहसीलदार निखिल सोनावणे व विद्यार्थ्यांचे पालकवर्ग उपस्थित होते .   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos