राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय भामरागड येथे स्वामी विवेकानंद जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
स्थानिक राजे विश्वेश्वरराव  कला वाणिज्य महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती निमित्य ' युवा दिन ' साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. लाड , प्रमुख अतिथी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. पि. एस.घोनमोडे,  प्रा.सी. एम. चालूरकर,  प्रा. डॉ. के. व्ही. निखाडे हे होते. अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ. लाड  यांनी प्रत्येक युवकांनी स्वामी विवेकानंदानी सांगितलेले विचार आत्मसात करून देशकार्य करावे असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. 
 कार्यक्रमाचे संचालन सोनी तोलामी तर आभार सविता वडे हिने मानले.     Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos