राष्ट्रीय लहुशक्ती संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी राजु येले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
मातंग समाजाचे मार्गदर्शक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते राजुभाऊ येले यांची राष्ट्रीय लहुशक्ती संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.  राष्ट्रीय लहुशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती म.शा. उपाध्यक्ष व सदस्य सचिव मधुकरराव कांबळे यांनी ही नियुक्ती केली आहे. 
 गत २५ वर्षांपासून राजुभाऊ येले मातंग समाजातील गोरगरीब, उपेक्षित व अन्यायग्रस्त बांधवांच्या न्याय हक्कासाठी संघर्षरत असून चंद्रपूर जिल्हा भाजपाचे सक्रीय ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून पक्ष संघटनेत त्यांचे लक्ष्यवेधक कार्य आहे. पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातनू समाज बांधवांच्या विविधांगी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते सदैव झटत असून सामाजिक संघटन बांधणीमध्येही त्यांचा मौलीक वाटा आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील लहुशक्ती संघटनेत चंद्रपूर जिल्हयाचे अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांचेवर सोपविण्यात आली आहे.
 सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्याचा मोठा अनुभव असल्याने या पदाला राजुभाऊ येले योग्य न्याय देतील असा विश्वास जिल्हयातील समाजबांधवाकडून व्यक्त होत आहे. राजुभाऊ येले यांच्या या नियुक्तीचे चंदू जाधव, गुलाब शिखरे, सुनिल डोंगरे, सिध्दार्थ येले, सुनिल वानखेडे, प्रा. अंगद गायकवाड, गणेश पोटफोडे, आशिष नामवाड, शंकर गायकवाड, त्रयंबक सुर्यवंशी, प्रल्हाद मदने, बालाजी मोटे, अंकुश काकडे, संतोष कांबळे  तसेच भाजप नेतेमंडळी, समाजबांधव व पदाधिका-यांनी स्वागत केले आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-12


Related Photos