महत्वाच्या बातम्या

 दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क योग्यता चाचणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : दहावी व बारावी विज्ञान शाखेतील  शैक्षणिक सत्र २०२२-२३ ला परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, याउद्देशाने संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील (ग्रामिण व शहरी क्षेत्रातील) सर्वसाधारण व दिव्यांग विद्यार्थ्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्या वतीने संस्थेत योग्यता चाचणीच्या नोंदणीला सुरुवात करण्यात आलेली आहे.

योग्यता चाचणीसाठी नोंदणी https://forms.gle/fKfAH७UG4 WiZooBr9 या लिंकवर करण्यात यावी. लिंकवर नोंदणी केलेल्या पहिल्या ५० विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीने टेस्ट प्रत्येक आठवड्याच्या सोमवारला मोफत घेऊन विद्यार्थ्याचे त्याच आठवड्याच्या बुधवार व गुरुवारला पालकांसोबत समुपदेशन करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संस्थेचे जिल्हा समुपदेशक विनोद गभणे यांना ८८०६०००१४७ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. समुपदेशक डॉ. योगेश्वर राऊत (९०४९१७०६५१), हरीश राठी (९७६५२४८३९०), प्रतिमा मोरे (९०२८०६६६३३), मोहन भेलकर (९०४९६७१४९१), विशाल गोस्वामी (८२७५०३९२५२) व गिरिधारी चव्हाण (९९६०७४९१६१) यांच्याव्दारे नि:शुल्क योग्यता चाचणी घेतली जाईल. योग्यता चाचणीदरम्यान संस्थेमार्फत कोणत्याही प्रकारचे प्रवास देयके, चहा, नास्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार नाही.

सदर उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. हर्षलता बुराडे यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos