व्येंकटापूरात गावठी दारू जप्त


 -मुक्तिपथ गाव संघटनेची कारवाई : पाच गावांची क्लस्टर कार्यशाळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा :
तालुक्यातील व्यंकटपूर येथील गाव संघटनेच्या महिलांनी बामणी येथील महिलांच्या सहकार्याने गावातील विक्रेत्यांकडून १० लिटर गावठी दारू जप्त केली. पोलिसांनी हा मुद्देमाल ताब्यात घेत दोन विक्रेत्यांवर कारवाई केली. क्लस्टर कार्यशाळेनंतर ही अहिंसह कृती करण्यात आली.
  दारूविक्री बंद केलेल्या गावांनी ती टिकवून ठेवण्यासाठी तर ज्या गावांमध्ये दारूविक्री बंद आहे अशा गावांनी खर्राविक्रीबंदीसाठी प्रयत्न करावे यासाठी व्यंकटपूर, बामणी, गर्कापेठा, ग्रासपेठा आणि वेनेलाया या पाच गावांची क्लस्टर कार्यशाळा मुक्तिपथ द्वारे व्यंकटपूर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी गावातील दारूविक्रीबंदीवर व ती टिकवून ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. चर्चेदरम्यान अहिंसक कृती करून व्यंकटपूर येथील दारूविक्रेत्यांकडील साठा नष्ट करण्याचे नियोजन करण्यात आले. काहीच दिवसांपूर्वी बामणी येथे झालेल्या एका अहिंसक कृतीत व्यंकटपूर येथील गाव संघटनेच्या महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी व्यंकटपूर येथील कारवाईसाठी बामणी येथील महिला उपस्थित होत्या. या बैठकीत झालेल्या चर्चेत गावातील ५ पुरुष आणि ५ महिला दारूविक्रेत्यांची नावे पुढे आली. या सर्व विक्रेत्यांच्या घरी धाड मारण्यात आली. यातील दोन विक्रेत्यांकडून दहा लिटर गावठी दारू गाव संघटनेला सापडली. बामणी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येत दारूसाठा जप्त करून दोन्ही विक्रेत्यांवर कारवाई केली. गावांतील विक्रेत्यांमध्ये महिलांचाही मोठा सहभाग आहे. अशा महिलांनी ही विक्री थांबवावी असे आवाहन कार्यशाळेत करण्यात आले. 
   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos