महत्वाच्या बातम्या

 नागपूर : लिलाव प्रक्रियेला ८ मे पर्यंत मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालयाच्या अधिपत्याखाली नागपूर विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निर्लेखित साहित्याची विक्री प्रक्रीया लिलाव पध्दतीने www.eauction.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केली असून त्यास ८ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

लिलावासंबंधीचे संपूर्ण वेळापत्रक, अटी व शर्ती आदींची माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. इच्छूक व पात्र लिलावधारकांनी प्रक्रीयेत भाग घेण्याचे आवाहन सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos