एकलपूर येथे क्षेत्रकार्याचा समारोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : 
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या अभ्यासक्रमानुसार क्षेत्रकार्य अंतर्गत आदिवासी समुदायाचा अभ्यास करण्यासाठी एकलपूरची  निवड करण्यात आली. यात परवानगी घेण्यापासून ते गावातील शैक्षणिक , सामाजिक आरोग्यदायक, भागातील माहिती तसेच सर्व्हेक्षण समस्यांवर आधारित कार्यक्रम व आज निरोप  या प्रकारे एकूण दहा दिवसीय क्षेत्रकार्य पूर्ण करण्यात आले. 
या निरोप समारंभाच्या  कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून देसाईगंज येथील  संवर्ग विकास अधिकारी स्वप्नील मगदूम तर विशेष अतिथी म्हणून तालुका पेसा समन्वयक जगदीश नागपुरे , स्वच्छ भारत मिशन किशोर लोखंडे, ग्रा.पं. सचिव आर.पी. मेश्राम, सरपंचा  वर्षाताई कोडापे, उपसरपंच अनिल नागमोती, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य भागडकर लिपिक ज्ञानेश्वर दुपारे, रामदास उईके, प्रवीण मेश्राम, ग्रा.पं. सदस्य आदिवासी बांधव तसेच गावकरी उपस्थित होते. 
 ग्रा.पं. ला भेट वस्तू म्हणून गणेश शेंडे, अक्षय सहारे, कुंदेश गुरनुले, यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याची फोटो भेट केली. शेवटी आपले  मनोगत व्यक्त करून या कर्यक्रमाचा शेवट करण्यात आला. कार्यक्रमाचा  यशस्वीसाठी  कार्यक्रमाचे संचालन गणेश शेंडे , प्रास्ताविक कुंदेश गुरनुले तर आभार अक्षय सहारे  यांनी मानले.     Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos