महत्वाच्या बातम्या

 जत्रा शासकीय योजनाची सर्वसामान्याच्या विकासाची अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद


- खरीप हंगाम पुर्व तयारी बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जत्रा शासकीय योजनाची सर्वसामान्याच्या विकासाची अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून या अंतर्गत खरीप हंगाम पुर्व तयारी बैठक  बुटीबोरी तालुक्यातील तामसवाडी व महलापूर येथे काल घेण्यात आले.

यावेळी शेतकऱ्यांना जमिनीची मशागत, सोयाबिन व कापूस, तूर वाणाची निवड, सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया एफआयआर पद्धत, कापूस व तूर सरी वरंबा पद्धतीने लागवड, सोयाबिन बीबीएफ, पट्टा पद्धत, सरी वरंबा वर टोकण पद्धतीने लागवड, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, mahadbt, राग्रारोहयो, PMFME योजना, माती परीक्षण, दशपर्णी अर्क तयार करणे, तसेच इतर योजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी तामसवाडी सरपंच नामदेव भोंगे, मंडळ कृषी अधिकारी युवराज चौधरी, प्रगतशील शेतकरी शेषराव भूते, कृषी मित्र प्रफुल्ल पोहुरकर, व इतर शेतकरी, कृषी सहाय्यक लता टोंगलवार यावेळी उपस्थित होते.

येणाऱ्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीकरिता शासनाच्या जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची अभियानांतर्गत भिवापूर तालुक्यात कृषी विभागाच्या चमुने धडाक्यात सुरुवात केली. भिवापूर तालुक्यातील महलापूर येथे शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला शेतकऱ्यांना भिवापूरचे  तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी चर्चासत्राच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी विकास योजना, पीक स्पर्धा, कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनाबाबत सविस्तर माहिती दिली. भिवापूरचे मंडळ कृषी अधिकारी आढळ यांनी फळबाग लागवड, महाडीबीटी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना इत्यादी योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.

नांद कृषी परिषदचे खुजे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या बैठकीस कृषी सहाय्यक काळे, रामेश्वर जाधव व राहुल जाधव व सरपंच बाळू वराडे उपस्थित होते. त्यानंतर कृषी विभागामार्फत मानिक शिवा पाटील यांच्या शेतात अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या शेततळ्याची पाहणी भिवापूर तालुका कृषी अधिकारी यांनी केली.





  Print






News - Nagpur




Related Photos