महत्वाच्या बातम्या

 अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आविस तथा अजयभाऊ मित्र परीवाराच्या उमेदवारांना निवडून द्यावे


- आविस सरसेनापती नंदूभ नरोटे यांचे आवाहन 

- जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थित बैठक संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार तर्फे आविसंचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात ३ एप्रिल रोजी नामनिर्देशन दाखल करण्यात आले असून आदिवासी विध्यार्थी संघ नेहमीच राजेशाहीच्या विरोधात लढत आले. कृषी उत्पन्न बाजार समितीत सुद्धा आजी माजी आमदारांना धडा शिकवा. 

२८ एप्रिल २०२३ ला सकाळी ८:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत अविका. ग्राम पंचायत सदस्य यांना मतदान करायचे आहे. आदिवासी विद्यार्थी संघाचे तथा अजयभाऊ मित्र परिवार समर्थीत उमेदवाराना मतदान करून निवडून द्यावी, असा आवाहन आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदू नरोटे यांनी केले.

यात व्यापारी गटातून पवन रामचंद्र ताटीकोंडावार, प्रज्वल पोचरेद्दी नागुलवार, सार्वत्रिक निवडणुक सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून रविंद्रराव भगवंतराव आत्राम, सैनु मादी आत्राम, अनिल सोमाजी करमरकर, अजय रामय्या कंकडालवार, बोदी कोलु बोगामि, रमेश शामराव वैरागडे, बाजीराव लालसू हिचामी, सहकारी संस्था महिला राखीव गटातून मालु रामा ईस्टाम, निर्मला अशोक येलमुले, सहकारी संस्था इ.मा.व. गटातून अजय रामय्या कंकडालवार, सहकारी संस्था वि.जा./भ. ज.गटातून येल्ला मूत्ता तोकला, ग्राम पंचायत सर्वसाधारण गटातून वैभव रामय्या कंकडालवार, संजय मदनय्या येजुलवार, ग्रामपंचायत अर्थिक दुर्बल गटातून किरण अरुण नैताम निवडणुक रिंगणात उभे आहेत. 

यावेळी नंदु नरोटे सरसेनापती आदिवासी विद्यार्थी संघ नागपूर, नंदू मट्टामी आविस तालुका अध्यक्ष, प्रज्वल नागुलवार आविस सचिव, संगी दुर्वा माजी पं.स. सदस्य एटापल्ली, सुधाकर टेकाम उपसरपंच जारावांडी, संतोष मडावी ग्रा.प. सदस्य दिंडवी, कैलाश उसेंडी सरपंच गुरुपल्ली, सुधाकर गोटा अध्यक्ष वेनंहारा इलाका, रमेश वैरागडे ग्रा. पं. गेदा, मुंनी दुर्वा माजी सरपंच तोडसा, आविस कार्यकर्ता मनिषा नरोटे, अनिल करमरकर, डोलेश मडावी अध्यक्ष तोडसा इलाका,अजय गावडे पो. पाटिल उडेरा, सुरेश मट्टामी, सैनू मट्टामी, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेक, प्रकाश दुर्गेसह एटापल्ली तालुक्यांतील आविस व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos