आरमोरी नगर परिषद निवडणूकीसाठी परिवर्तन पॅनलने जाहिर केले उमेदवार, निवडणूक होणार रंगतदार


- अभ्यासू व योग्य उमेदवारांना दिली उमेदवारी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मिथून धोडरे / आरमोरी :
स्थानिक नवनिर्मित नगर परिषदेच्या निवडणूकीच्या घडामोडींनी वेग घेतला असून पहिल्याच निवडणूकीत मोठी राजकीय उलथापालथ होताना दिसून येत आहे. प्रमुख राजकीय पक्षांसोबतच आता नाराज शिवसैनिकांना घेवून उदयास आलेल्या परिवर्तन पॅनलने निवडणूकीत कंबर कसली आहे. योग्य व अभ्यासू तसेच सर्वांचे परिचित अशा उमेदवारांना या पॅनलमध्ये संधी देण्यात आली आहे. यामुळे परिवर्तन पॅनल नक्कीच मातब्बर राजकीय पक्षांना मात देईल, अशी चर्चा आता आरमोरी शहरात ऐकावयास मिळत आहे.
परिवर्तन पॅनलने नगराध्यक्षपदासह आठही प्रभागातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातून विजय तुकाराम बगडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १ मधून नामाप्र स्त्री साठी मेघा गोपी मने, सर्वसाधारण प्रवर्गातून प्रणव रमेश गजपुरे, प्रभाग क्रमांक २ साठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी हरेंद्र नामदेव मडावी, सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी कल्पना मधुकर ठाकरे प्रभाग क्रमांक ३ साठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी विनोद भिमराव निकुरे, प्रभाग क्रमांक ४ साठी अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी शर्मिला भानुदास मसराम, नामाप्र प्रवर्गातून योगेश वामन देविकर, प्रभाग क्रमांक ५ साठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ईश्वर जयराम हिरापुरे, सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी कल्पना विवेक तिजारे, प्रभाग क्रमांक ६ साठी सर्वसाधारण प्रवर्गातून माणिक पंढरी भोयर, प्रभाग क्रमांक ७ साठी नामाप्र स्त्री प्रवर्गासाठी वर्षा नानाजी वाढई, सर्वसाधारण प्रवर्गासाठी तानाजी मनोहर कुथे, प्रभाग क्रमांक ८ साठी अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी पुष्पा शालिक घरत (वरखडे)ख् नामाप्र प्रवर्गातून सागर चंद्रशेखर मने, सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून स्मिता चांगदेव सपाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
परिवर्तन पॅनल प्रमुख राजकीय पक्षांना नक्कीच टक्कर देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आरमोरी नगर परिषदेची ही पहिलीच निवडणूक असून प्रत्येक पक्षात राजकीय चुरस वाढतांना दिसून येत आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos