राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त प्रशासनाची आदरांजली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची आज जंयती.  जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्या वतीने अपर निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या फोटोला माल्यार्पण करुन आदरांजली वाहिली.
यावेळी सहाय्यक नियोजन अधिकारी सुनील पाटील , नायब तहसिलदार बालाजी सोपनकर, नाझर ठाकरे, वासुदेव कोल्हटकर, दिवाकर सोरते, दयाराम मेश्राम, चांभारे, जिल्हा माहिती कार्यालयातील प्रभाकर कोटरंगे, वामन खंडाईत, दिनेशकुमार वरखेडे, सुशिल कोटरंगे आदी. सर्व  कर्मचारी मोठया संख्येन उपस्थित होते.
उपस्थित सर्व कर्मचारी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद  यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos