पोंभुर्णा येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  पोंभुर्णा :
  स्थानिक म. ज्योतिबा फुले नवीन सभागृहात आज राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली.  कार्यक्रमाचे आयोजन सत्यशोधक विचार युवा मंच, पोंभुर्णा यांच्या वतीने करण्यात आले. 
या कार्यक्रमात  अखिल भारतीय माळी महासंघ पोंभुर्णा तालुका अध्यक्ष  भुजंग ढोले व सत्यशोधक विचार युवा मंच पोंभुर्णा अध्यक्ष श्रीकांत शेंडे व नूतन खोब्रागडे यांनी माँ साहेब यांच्या जीवनपटावर मार्गदर्शन केले  . यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष सद्गुरू ढोले, बुद्धिस्ट युथ वेल्फेअरचे अध्यक्ष अतुल वाळके, राजू खोब्रागडे आणि सत्यशोधक विचार युवा मंचाचे उपाध्यक्ष बंडू गुरनुले ,संघटक अभय गुरनुले तसेच रोशन गुरनुले, रुपचंद गुरनुले, अमोल ढोले, पंकज कोटरंगे, शुभम ढोले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे संचालन प्रशांत गुरनुले यांनी केले तर आभार सुरज ढोले यांनी मानले.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-12


Related Photos