महत्वाच्या बातम्या

  आजचे दिनविशेष


२७ एप्रिल महत्वाच्या घटना

१८५४ : पुण्याहून मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.

१९०८ : चौथ्या ऑलिम्पिक खेळांना लंडन येथे सुरुवात झाली.

१९४१ : दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी अथेन्समधे प्रवेश केला.

१९६१ : सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९७४ : राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली.

१९९२ : बॅटी बूथरायड ह्या ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या लोकप्रतिनिधी निवडून येणारया पहिल्या महिला ठरल्या.

१९९९ : एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार झाली.

२००५ : एअरबस ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

२०११ : अमेरिकेच्या दक्षिण भागात टोनँडोंचा उद्रेक त्यात ३०० ठार झाले.


२७ एप्रिल जन्म

१७९१ : मोर्स कोड व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल १८७२)

१८२२ : अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष युलिसीस एस. ग्रॅन्ट यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै १८८५)

१८८३ : नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९६४)

१९१२ : भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर जोहरा सेहगल यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २०१४)

१९२० : महात्मा गांधींचे अनुयायी डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९९३)

१९२७ : मार्टिन ल्युथर किंग यांची पत्नी कोरेटा स्कॉट किंग यांचा जन्म.

१९७६ : पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक फैसल सैफ यांचा जन्म.


२७ एप्रिल मृत्यू

१५२१ : पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मॅगेलन यांचे निधन.

१९८० : पद्मश्री सहकारमहर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९०१)

१८८२ : अमेरिकन लेखक व तत्वज्ञ राल्फ वाल्डो इमर्सन यांचे निधन. (जन्म: २५ मे १८०३)

१९८९ : पॅनासोनिक कंपनी चे स्थापक कोनोसुके मात्सुशिता यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८९४)

१८९८ : ज्योतिर्विद शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १८५३)

२००२ : बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुली च्या जनक रुथ हँडलर यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९१६)

२०१७ : भारतीय अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९४६)






  Print






News - todayspecialdays




Related Photos