महत्वाच्या बातम्या

 पायलट प्रशिक्षणार्थी वैष्णवीची मेंदू विकाराशी झुंज, शस्त्रक्रियेसाठी लाखोंचा खर्च : आ.वडेट्टीवार व मित्र मंडळ मदतीसाठी सरसावले 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : वडील अल्पभूधारक शेतकरी, घरची परिस्थिती हलाखीची या कठीण संघर्षमय जीवनमानातून मार्ग काढून अभ्यासुवृत्ती, जिद्द व चिकाटीच्या बळावर गरुड झेप घेणाऱ्या ब्रह्मपुरी येथील पायलट प्रशिक्षणार्थी वैष्णवी सतीश उराडे ही यशाची शिखर गाठण्याच्या उंबरठ्यावर असतांना तिला मेंदू विकाराचा गंभीर आजार जडला. अशातच वैद्यकीय उपचारादरम्यान डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला देत सहा लाख रुपयांचा खर्च सांगितल्यानंतर हतबल झालेल्या उराडे कुटुंबीयांना सुचेनासे झाले. अशा केविलवाण्या परिस्थितीत कुराडे कुटुंबीयांची व्यथा जाणून घेत राज्याची माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार व मित्र मंडळ यांनी तीळमात्र ही वेळ न घालवता नागपूर येथील रुग्णालय गाठून वैष्णवी ची भेट घेत तिच्या उपचाराकरिता 85 हजार रुपयांची रोख मदत केली.


महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील मागासवर्गीय बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी समजून घेत महाज्योती संस्थेची स्थापना केली. महाज्योती अंतर्गत विविध क्षेत्राचे प्रशिक्षण देण्यात येते. अशाच प्रशिक्षणापैकी एक असलेल्या पायलट प्रशिक्षणार्थी म्हणून ब्रह्मपुरी येथील कुर्झा वॉर्डांत राहणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी सतीश उराडे यांची कन्या वैष्णवी उराडे हिने आपली अभ्यासू वृत्ती जिद्द व चिकाटीच्या बळावर परीक्षेमध्ये यश संपादन करून महाज्योती अंतर्गत सुरू झालेल्या पायलट प्रशिक्षण या क्षेत्रात करियर घडवण्याची महत्त्वकांक्षा ठेवत प्रवेश केला. 


या प्रशिक्षणा अंतर्गत वैष्णवीला मेंदू विकाराचा गंभीर आजार जडला. घरची परिस्थिती हलाखीची असताना कसेबसे शिक्षण पूर्ण करून आकाशात उंच झेप घेण्याची महत्वकांक्षा बाळगत संघर्षमय जीवनातून वाट काढू पाहणाऱ्या उराडे कुटुंबीयांवर पुनश्च एकदा दुःखाचे डोंगर कोसळले. वैष्णवीला मेंदू विकाराच्या गंभीर आजारांतर्गत उपचाराकरिता नागपूर येथील श्रीकृष्ण हृदयालय या इस्पितळात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीअंती डॉक्टरांनी तिला ब्रेन हॅमरेज या गंभीर आजारा अंतर्गत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. व शस्त्रक्रियेसाठी सहा लाख रुपयांपर्यंतचा खर्च सांगितला. आपल्या मिळकतीतून दोन वेळचे अन्न व कुटुंबाचा उदरनिर्वाह या पलीकडे शिल्लक नसलेल्या सतीश उराडे यांचे पुढे 6 लक्ष रुपयांचा खर्चाचा यक्ष प्रश्न उभा ठाकला असताना राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनाही वार्ता समजतात क्षणाचाही विलंब न करता नेहमीच रुग्णसेवेला ईश्वरीय कार्य मानणारे , तसेच नागरिकांप्रती माणुसकीचे ऋणानुबंध जोपासणारे माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट रुग्णालय गाठून वैष्णवी ची भेट घेतली व प्रकृतीची विचारणा करत डॉक्टरांशी वार्तालाप करून शस्त्रक्रिया संबंधी सूट देण्याची विनंती करत स्वतः व मित्र परिवाराकडून उराडे कुटुंबीयांना रोख 85 हजार रुपयांची मदत दिली. 


याप्रसंगी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, नगरपरिषद सभापती विलास विखार उपस्थित होते. त्यांच्या या मदत रुपी पुढाकाराने वैष्णवीच्या शस्त्रक्रियेचा मार्ग सुकर झाला असून लवकरच तिच्यावर शस्त्रक्रिया होऊन तिचे पायलट होण्याचे स्वप्न अधांतरी न राहता पुनर्जीवित झाले आहे. मतांचे राजकारण करणारे अनेक होऊन गेलेत मात्र राजकारणात केवळ सत्ताकारणाचा लोभ न बाळगता आता क्षेत्रातील जनतेला परिवारातील सदस्य समजून त्यांच्या समस्या अडचणी व ओढावलेले संकट जाणून घेणारा सच्चा जनसेवक म्हणून माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांच्या सहृदयी भावनेने आजवर अनेक रुग्णांना जीवनदान मिळालेले असून माझी मंत्री वारांची कर्तव्या पलिकडील धडपड पाहून उराडे कुटुंबही भारावले.






  Print






News -




Related Photos