महत्वाच्या बातम्या

 युवारंग च्या निशुल्क समर कॅम्पला विद्यार्थ्यांचा भरभरून सहभाग 


- समर कॅम्प च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनचा सर्वांगीण विकास होईल : श्रीपाद वटे 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : नेहमी सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याऱ्या युवारंग तर्फे २६ एप्रिल २०२३ पासुन ते १४ मे २०२३ पर्यंत निशुल्क समर कॅम्प चे आयोजन करण्यात आलेले आहे. या समर कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांना कराटे, डान्स, संगणक, बँकिंग, सेंद्रिय शेती, शरीर विज्ञान, संगीत, सर्प विज्ञान, क्रीडा मध्ये कबडी, खोखो, फुटबॉल, रग्बी, आयुर्वेद व इतर विषयाबाबत माहिती दिली जाणार आहे.  


या निशुल्क समर कॅम्प चे उद्घाटन २६ एप्रिल २०२३ ला सकाळी ६:३० वाजता स्वामी विवेकानंद विद्यालय, आरमोरी येथे आयोजित करण्यात आलेले होते.  या कार्यक्रमाला अध्यक्ष अतिथी म्हणून युवारंग महिला कमिटी च्या प्रमुख मा.चंदा राऊत, तर उद्घाटक म्हणून स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्यध्यापक श्रीपाद वटे प्रमुख अतिथी म्हणून सहारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राहुल जुआरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोज गेडाम यांनी मानले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos