विद्यार्थ्यांनी मोबाईल चा वापर ज्ञानकुंभा सारखा करावा : उमेश खारोडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
तंत्रज्ञानाचे युगात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच आपल्यातील कला कौश्यल्य ओळखुन  व्यक्तिमत्व विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करा. मोबाइल चा वापर करमणूकिचे साधन म्हणून युवा वर्ग मोठ्या प्रमाणात करतात हे  योग्य नसुन इंटरनेट वर कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगारा बाबत मोठ्या प्रमाणात माहीती उपलब्ध असुन मोबाईलचा उपयोग ज्ञानकुंभा सारखा करून स्वतःचा विकास साधावा,असे मत जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी  उमेश खारोडे यांनी व्यक्त केले. 
विद्याविकास कला ,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय समुद्रपुर येथे दोन दिवशीय सांस्कृतिक महोत्सव आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव डॉ.उमेश तुळसकर होते .  प्रमुख मार्गदर्शक उमेश खारोडे वर्धा , प्रमुख अतिथी डॉ.आनंद सहत्रबुघे उपप्राचार्य मोहता सायन्स नागपूर, ,प्राचार्य डॉ रमेश बोभाटे, उपप्राचार्य डॉ.राजविलास कारामोरे, संयोजक प्रा. फारीश अली, सहसंयोजक प्रा.राहूल गजभिये उपस्थित होते. 
 पुढे बोलतांना खारोडे म्हणाले कि,  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या सारख्या थोरपुरूषांचे विचार आत्मसात करून यशस्वी व्यक्ति चे मार्गदर्शन घेत आपले भविष्य घडवा. तर डॉ.  सहस्त्रबुधे म्हणाले गुणा पेक्षा गुणवत्ता वाढवून शिक्षणाचे काळात वाचण वाढवा ग्रामीण विद्यार्थी मागे पडतो हा गैरसमज दूर करण्याचा सल्हा दिला. तसेच उत्कृष्ठ कार्याबदल राष्द्रीय सेवा योजन जिल्हा समन्वयक प्रा.मेघशाम ठाकरे, एनसिआरटी चे सदस्य पदी निवडीबद्दल प्रा. डॉ मिलिंद कांबडे तर प्रा.किरण वैध्य यांची रस्ता सूरक्षा समीतीचे सदस्य पदी निवडीबद्दल महाविद्यालयाचे वतीने यांना मान्यवराचे हस्ते सन्मानित करण्यात आले.  
प्राचार्य  डॉ.  रमेश बोभाटे यांनी महाविद्यालयाची माहीती दिली तर प्रास्ताविक प्रा.फारीश , सूत्रसंचालन प्रा.विजय वानखडे तर आभार प्रा.राहूल गजभिये यांनी मानले .  कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा विठ्ठल चंदनखेडे, प्रा.नितीन अखुज,  प्रा.विलास बैलमारे, प्रा.रमेश निखाडे,प्रा.मनोज कोरेकर,प्रा.अजय मोहोड ,प्रा घनशाम कदम , प्रा.दिपक वादे, प्रा.मनोज खेकरे, प्रा.रतन आस्कर, प्रा.राजू बाभुलकर, प्रा.महेश चिव्हाने, प्रा.कडसकर, प्रा.रामटेके, अशोक झाडे, योगेश घटे ,पवार सह राष्द्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवका सह अनेकांनी परिश्रम घेतले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos