अंकिसा येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अंकिसा (सिरोंचा) : 
येथील श्रीनिवास रॉय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. टी. वाढई होते.  प्रमुख अतिथी म्हणून  पी. डी. मांडवे,  एम. डी. समर्थ  आणि  के. व्ही. रनगंटी   उपस्थित होते. 
या प्रसंगी विद्यार्थ्यांची भाषण स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये माध्यमिक गटा मध्ये प्रथम क्रमांक रितेश पाडी ,व्दितीय रोहित गोवुरी आणि तृतीय क्रमांक  साईपूजा गोतुरी यांनी पटकाविला . तर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक जितेंद्र लटकरी ,व्दितीय राकेश जेट्टी तर तृतीय क्रमांक  प्रांजला सपिडी हिने पटकाविले 
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. मदेर्ला यांनी केले तर सूत्रसंचालन जितेंद्र लटकरी आणि आभार प्रदर्शन प्रांजला सपिडी हिने केले. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी एम.ए. मेश्राम  ,व्ही. डब्लू. सुधीर   , यु. एम. दुमाने तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.      Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos