महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय पंचायतराजदिनी ७१७ सनदचे वाटप


- तालुकास्तरावर सनद वाटप शिबिर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयाच्यावतीने स्वामित्व योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या सनदचे तालुकास्तरावर शिबिराचे आयोजन करुन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख प्रमोद ठुबे यांच्या मार्गदर्शनात 717 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्यावतीने 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायतराज दिवस  जिल्ह्यात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. या दिवसानिमित्त भुमि अभिलेख विभागाच्यावतीने जिल्ह्यातील आठही तालुक्यात सनद वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यामध्ये विविध 31 ठिकाणी सनद वाटप शिबिराचे आयोजन करुन 717 लाभार्थ्यांना सनदचे वाटप करण्यात आले.

सनद वाटपासून 4 लाख 11 हजार रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला. तसेच दर महिन्याच्या गुरुवारी अशा प्रकारचे सनद वाटपाच्या शिबिराचे तालुका स्तरावर आयोजन करण्यात येत आहे व लाभार्थ्याना त्यांचे मिळकतीच्या सनद वाटप करण्यात येतात.

तालुकास्तरावर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद ठुबे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या शिबिरात उपअधिक्षक भूमी अभिलेख वर्धा प्रसन्ना भुजाडे, उपअधिक्षक आष्टी मिलींद भोळे, उपअधिक्षक  कारंजा अरविंद सांभारे, उपअधिक्षक सेलू सुखदेव खोंडे उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos