ग्राम अंभोरा येथे विनोद अग्रवाल यांच्याहस्ते विकासकामाचे भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
मागील २० वर्षापासून गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाच्या नावावर फक्त स्वार्थाचे राजकारण केले जात आहे. मात्र गोंदियाचा खरचं विकास झाला का? गोंदिया विधानसभा क्षेत्र हा काही राजकारण्याचा स्वार्थीपणाचा बळी पडला आहे. अनेक ठिकाणी अद्यापही सोयी, सुविधांचा अभाव आहे. नागरिकांना योजनांचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळेच हा क्षेत्र सर्वांगिण विकासापासून दूर राहिला आहे. मात्र स्थानिक जनप्रतिनिधी विकासाचा गाजावाजा करून नागरिकांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे अशा संधीसाधु राजकारण्यापासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे, असे मत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले. 
अंभोरा येथे २५/१५ योजने अंतर्गत विविध विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले, यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना विनोद अग्रवाल बोलत होते. यावेळी कार्यक्रमात उपसरपंच राजेश रामटेके, दशरथभाऊ चौधरी,  सोमा तुरकर, भरतलाल साठवणे, शिवचरण साठवणे, नोकलाल चौधरी, गोखलाल चौधरी, सोमा पटले, डिलेचंद चौधरी, आशाचंदा भिमटे, सुरेष भिमटे, किरण मेश्राम, दशरथ तुरकर, रामलाल तुरकर, जीवनलाल येडे, चंदन पारधी, ब्रिजलाल चौधरी, चैतराम पटले, मंगरू चामलाटे, भिवराम सोनटक्के, मुकेष डहाट, सजय मेश्राम, धमेंद्र रामटेके, पुस्तकला तुरकर, भागनबाई चौधरी, सुकमाबाई तुरकर, व्दारकाबाई रहांगडाले, भागरताबाई साठवणे, जयपुराबाई पटले, मंतरूबाई पटले, वामनबाई चौधरी, योगिताबाई पटले, योगेंद्र हरीणखेडे, जयवंताबाई रामटेके, सविताबाई रामटेके, शांताबाई शहारे, प्रमिलाबाई तुरकर, सुकलाल रहांगडाले, चोपलाल तुरकर, अशोक चौधरी, हरीचंद चौधरी, प्रकाश पटले, सुकलाल पटले, जयलाल चौधरी, देविलाल पारधी आदिं सह गावकरी मोठया संख्येत उपस्थित होते.
 



  Print






News - Gondia | Posted : 2019-01-12






Related Photos