महत्वाच्या बातम्या

 अभाविप चंद्रपूर व्दारा आयोजित उत्कर्ष २०२३ व्यक्तीमत्व विकास शिबीराचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर महानगर व्दारा आयोजित उत्कर्ष 2023 व्यक्तीमत्व विकास शिबीर आज पासून म्हणजेच 26 व 27 एप्रिल रोजी संपन्न होत आहे. आज 26 एप्रिल रोजी या शिबिराचे उद्घाटन झाले यावेळी प्रमुख अतिथी दामोदर सारडा (Chartered Accountant), प्रमुख उपस्थिती. शक्ति केराम यांच्यासह चंद्रपूर नगर अध्यक्ष प्रा. पंकज काकडे, चंद्रपूर नगर सहमंत्री पियुष बनकर,‍ शिबिर संयोजक केवल मेहता उपस्थित होते. या शिबिरात आज व उद्या व्यक्तिमत्व विकास, Emotional Intelligence & Swot Analysis, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, खेळ, Career Guidance, How to come out of Depression, Open Mic या विषयावर शिबिरात उपस्थित 150 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि चर्चा सत्र, मुलाखत सत्र यांसारखे विविध उपक्रम या दोन दिवसीय शिबिरात राबविल्या जाणार आहेत. या शिबिराचा शेवट समारोप सत्राने होणार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos