गोंडवाना सैनिकी विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात आज १२ जानेवारी  रोजी  राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. 
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य   संजिव गोसावी  होते   प्रमुख अतिथी म्हणुन   चैतालीताई खटी,   निता पुल्लीवार   तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक   ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक  अजय वानखेडे तसेच इतर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयात युवा दिनानिमित्य स्वामी विवेकानंद यांच्या जिवनचरीत्रावर  चैतालीताई खटी   यांचा एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला. तसेच विद्यालयाचे प्राचार्य गोसावी यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जिवनचरीत्रावर प्रकाश टाकत विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.   गजानन ढोले यांनी केले. आभार वेंकटरमन गागापूरवार यांनी मानले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos