पोलिस हा मित्रत्व जपणारा व्यक्ती : आमदार ॲड. संजय धोटे


- भारी येथे जनजागरण मेळावा  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा :
  एखाद्या गुन्ह्यावर अंकुश ठेवायचं असल्यास पोलीस विभागाची मदत घ्यावी लागते. कोणत्याही गुन्हेगाराला   शिक्षा द्यायची असल्यास पोलीस हा आपले कर्तव्य बजवून आपली जबाबदारी पूर्ण करतो.  पोलीस हा आपला शत्रू नसून मित्रत्व जपणार व्यक्ती असल्याचे आमदार ॲड. संजय धोटे यांनी जिवती तालुक्यातील भारी येथे आयोजित जनजागरण मेळाव्या प्रसंगी बोलताना सांगितले. प्रत्येक नागरिक हा पोलिसांवरील आपला राग व्यक्त करतो, मात्र नागरिकांनी पोलीस बांधवांशी एकमत राहून सहकार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले,
 यावेळी मंचावर जिल्हा परिषद सभापती  गोदावरी केंद्रे, उपविभागीय अधिकारी विलास यामावार, जिल्हा परिषद सदस्य गोदरू जुमनाके, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुरेश केंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, आबाजी पा ढुमणे,  सरपंचा  संगीता पेंदोर, माणकू कोटनाके, ममता जाधव, भोजु किनाके, पोलीस प्रभारी अधिकारी बोंद्रे, कोसुरकर, पवार, नाईकवाड, मलिक, खरतडे, लाकडे, पुंजारवार उपस्थित होते. 
यावेळी पुढे बोलताना आमदार ॲड. संजय धोटे म्हणाले की प्रशासन हे जनतेच्या हिताचे कार्य करून शासनाच्या योजना यशस्वीरीत्या राबवतात.  तसेच जिवती तालुक्यातील कोणत्याही प्रकारे आपल्या विभागा मार्फत जनतेचे मन दुखल्या गेले नाही पाहिजे याची काळजी सुध्दा पोलीस विभागाने घेतली पाहिजे.  तसेच पोलीस विभागाने जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी आमदार धोटे यांनी केले. कार्यक्रमा प्रसंगी गावातील तसेच परिसरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती  होती.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-11


Related Photos