महत्वाच्या बातम्या

 पुढील पाच दिवस मुसळधार पाऊसची शक्यता, नागरिकांनी सावधानता बाळगावी : जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील मागील तीन दिवसा पासून मुसळधार पाऊस वीजांच्या कडकडाटेसह मेघागर्जन सुरु आहे. आज पासून पुढील पाच दिवस गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पाऊस वीजांच्या कडकडाटेसह मेघागर्जन असलेल्या माहिती नागपूर हवामान विभागाने वर्तविलेला आहे व येलो अलर्ट जरी केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सावधानता बाळगावी अशी लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आवाहन करत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील २४ एप्रिल रोजी देसाईगंज तालुका मुख्यलयापासून जवळच असलेल्या कुरखेड मार्गावर मुसळधार पाऊस सुरु झाल्याने झाडाचा आसरा घेतल्यामुळे एकच कुटूंबातील चार जण मूत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हवामान विभागने वर्तविलेल्या अंदाजानुसार विजांच्या कडकडाटा, मेघगर्जना व पाऊस पडण्याची शक्यता असून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अधिकच सतर्क राहणे आवश्यक असून स्वतःची व कुटुंबाची सुरक्षेतेची काळजी घ्यावी, असे आवाहन माजी जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांनी केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos