देवाडा येथील बौद्ध विहाराचे होणार सौंदर्यीकरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
जिल्ह्यातील देवाडा येथील बौद्ध विहाराचे सौंदर्यीकरण मागासवर्गीय कल्याणकारी निधी अंतर्गत होणार असून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या प्रयत्नातून ३ लाख रुपयांची तरतूद होणार आहे. या कामाचे भूमिपूजन जि. प. समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांचा हस्ते करण्यात आले. 
चंद्रपूर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या छोट्यात छोट्या ते मोठ्यात मोठ्या गावापर्यंत पोहचवून जि. प. समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी अनेक समाजभवन तसेच विहाराला नवे रूप दिले आहे.  आज त्यांच्याकडून होणाऱ्या कार्यामुळे गावातील सौंदर्यीकरणाला वाव मिळाली आहे . त्यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या या कार्यामुळे गावातील नागरिकांच्या जीवन शैलीला नवे रूप मिळाले असून ठीक ठिकाणी गावाचा विकास होत आहे . 
 देवाळा  येथील बौद्ध विहाराला नव्याने काही वास्तूत बदल करून बाजूचा परिसराचे सौन्दरीकरण होणार असून त्या गावातील नागरिकांना प्रसन्नता जाणवेल .  यावेळी वंदनाताई पिपळशेंडे , कमलाकर येडमे, सुनील मुळे, दौलत देठे, चित्रेश्वर देवगडे ,बबन रामटेके, रवींद्र उपरे, ,मयूर मुळे, नामदेव डोके, विनोद चाफले , मनोज रामपेल्ली , किशोर रामटेके, भय्याजी वाघाडे, नंद  देवगडे व गावकरी उपस्थित होते.  

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-11


Related Photos