महत्वाच्या बातम्या

 सार्वजनिक वाचनालय उद्घाटन व लोकार्पण सोहळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : पोमके मन्नेराजाराम हद्दीतील मुला-मुलीचा विकास व्हावा या दृष्टीकोणातून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोमके मन्नेराजाराम अंतर्गत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या संकल्पनेतून व अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोमके मन्नेराजाराम येथील प्रभारी अधिकारी पोउपनी उमेश कदम यांच्या नियोजनाखाली, पोउपनी एम. पाटील, पोउपनि येरमे तसेच सर्व जिल्हा पोलीस अंमलदार SRPF अधिकारी/अंमलदार आणि CRPF असिस्टन्स कमांडन्ट राठोड व मन्नेराजाराम येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून एक गाव एक वाचनालय या संकल्पनेतुन २५ एप्रिल २०२३ ला सार्वजनिक वाचनालय उभारण्यात आले आणि उदघाटन व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन रमेश मंडलवर व लिनी सिडाम रा. मन्नेराजाराम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन, मालार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तत्पुर्वी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथ दिंडीची सुरुवात प्रा.आ. केंद्र  मन्नेराजाराम येथून काढण्यात आली व गावातून  ग्रंथदिंडी काढण्यात आली. प्रभारी अधिकारी कदम यांनी  विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व वाचनाचे महत्त्व सांगून सदर वाचनालयाचा लाभ घेणे बाबत नागरिकांना व विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच मरमपल्ली येथील रेला नृत्य गृप यांनी रेला डान्स सादर केला. त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.      

वाचनालयासाठी पुरविण्यात आलेली सुविधा : १)  सुसज्ज हाँल व वाचनालय साठी कार्यालय २) पुस्तके ठेवण्यासाठी कपाट  - ०२  ३) व्हाईट बोर्ड क्लास करिता-०१ ४) ०२ मोठे टेबल २० खुर्ची ५) महापुरुषांच्या प्रतिमा -५ ६) वाचन पुस्तके - १०० ७)जग,भारत,महाराष्ट्र,आणि गडचिरोली जिल्ह्याचे नकाशे  ८) कुलर -०१ ९) वही,पेन वाटप - १०० १०) कॉम्प्युटर संच - ०१

सदर कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचयात मन्नेराजाराम, येचाली पोमके हद्दीतील पोलीस पाटिल, गाव पाटील, शिक्षक वृंद, विद्यार्थी तसेच गावातील नागरिक हजर होते. कार्यक्रम संपल्यावर उपस्थितांना नास्ताची व्यवस्था करण्यात आली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos