केटीएस रुग्णालयात उद्या इपिलेप्सी शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत व इपिलेप्सी फाऊंडेशन मुंबई यांचे संयुक्त वतीने ७२ वे इपिलेप्सी शिबिराचे आयोजन कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे १२ जानेवारी रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत घेण्यात येणार आहे. सदर शिबीर मोफत असून या शिबिरामध्ये इपिलेप्सी/आकडी अपस्मार फेफरे/फिट या रोगावर उपचार व औषधे वाटप करण्यात येतील. 
यावेळी तज्ञ न्युरोफिजीशीयन मार्फत तपासणी व उपचार, ई.ई.जी.रक्त तपासणी, समुपदेशन, भौतिकोपचार, व्यवसयोपचार, वाचा व भाषा विकार उपचार इत्यादी सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल. तरी जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक,  .टी.एस.सामान्य रुग्णालय गोंदिया यांनी केले आहे.

   Print


News - Gondia | Posted : 2019-01-11


Related Photos