महावितरणकडून कागदविरहित गो-ग्रीन वीजबिलाला १० रुपये सवलत, ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
वीजबील भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारणाऱ्या ग्राहकांना प्रती वीजबील १० रुपये सवलत महावितरणने १ डिसेंबर २०१८ ला जाहीर केली होती.  मागील एका महिन्यात राज्यातील सुमारे २१ हजार ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. अन्य ग्राहकांनीही या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
 वीजबील ऑनलाईन पाहण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल ॲप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीनसुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. अशा सर्व ग्राहकांना १ डिसेंबर  २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाचीनोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर https://billing.mahadiscom.in/gogreen.php येथे जाऊन करावी, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे. 
गो-ग्रीनचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना चंद्रपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर मंडलातील २३४ तर गडचिरेाली मंडलातील १०६  ग्राहकांनी घेतला आहे.  चंद्रपूर मंडलातील एकंदरीत  ५२७९३७   ग्राहकांपैकी ४६३५११   ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदनी केली आहे. गडचिरेाली मंडलातील एकंदरीत  २०५१९३ ग्राहकांपैकी १६२२३७ ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदनी केली आहे.             
 गो-ग्रीनचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही त्यांना सोपे ठरणार आहे. गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा लाभ घ्यावा, असेआवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी केले आहे.
 



  Print






News - Chandrapur | Posted : 2019-01-11






Related Photos