अहमदनगरमधील उच्चभ्रू वसाहतीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : चौघांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अहमदनगर :
सावेडी उपनगरातील उच्चभ्रू वसाहतीत सेक्स रॅकेट चालणाऱ्या बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला . या प्रकरणी पोलिसांनी  परप्रांतीय चार महिलांना ताब्यात घेतले आहे.  तर दोन पुरुषांना अटक केली असून  ‘पीटा’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावेडी उपनगरातील महावीरनगर या उच्चभ्रू वसाहतीतील बंगला भाड्याने घेऊन  रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली . महावीरनगर वसाहतीत अनेक डॉक्टर व व्यापारी यांचे बंगले आहेत तसेच काही रुग्णालयेही आहेत. या भागातील रत्नप्रभा या बंगल्यात हे सेक्स रॅकेट चालवले जात होते. याची माहिती मिळताच गुरुवारी संध्याकाळी या बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला. तिथून दोन पुरुषांना पोलिसांनी अटक केली असून चार महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-01-11


Related Photos