९ वर्षांनंतर मनोरुग्ण धर्मपाल तिखाडे सुखरूप घरी : केरळच्या सामाजिक संस्थेची मदत


-  नातेवाईक गहिवरले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
अचानकपणे ९ वर्षापुर्वी आपल्या बहिणीच्या घरून गेलेला मनोरुग्ण भाऊ नांदेड केरळ येथील सामाजिक संस्थेच्या मदतीने आपल्या घरी सुखरूप आल्या नंतर त्यांच्या घरच्या लोकांचा आनंद व या आनंदात सारे कुटुंब गहिवरून गेले असल्याचे चित्र वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्या.पोलीस ठाण्याच्या हद्दीत आर्वी तालुक्यातील परतोडा येथे आज शुक्रवारी सकाळी पहायला मिळाले.  तब्बल ९ वर्षानंतर नांदेड येथे सुखरूप सापडलेल्या पाहण्यासाठी नातेवाईकांसह गावकऱ्यांनी त्यांच्या घरी मोठी गर्दी केली होती . 
 धर्मपाल सुखदेवराव तिखाडे वय ५२ वर्ष रा.पडतोडा हा इसम मनोरुग्ण असून वेडसर इसम आपल्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील संगीताबाई दहाट नामक बहिनीच्या घरून ९ वर्षे आधी निघून गेला होता.  तेव्हा पासून अनेक वर्षे त्यांचा शोध नातेवाईकांनी घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही.  शेवटी त्यांचं काय झालं ते जीवित आहे की नाही याचं विवंचनेत कुटुंब होते.  अखेर गुरुवारची सकाळ त्यांचे परिवाराला आनंद देणारी निघाली केरळ येथील दिव्य गारूना या सामाजिक संस्थेने फोन मनोरुग्ण धर्मपाल यांचा मुलगा रुपेश वय,२५ याला आला, 'तुझे वडील हे आहेत का? या ठिकाणी आहे ते सुखरुप आहेत' तुम्ही काळजी करू नका आम्ही येतं आहे .घरी त्यांना घेऊन असे म्हणत व्हाट्सअप वरून व्हिडीओ कॉल करून ही खात्री करून घेतली व शुक्रवारी मनोरुग्ण धर्मपाल तिखाडे यांना त्यांचे घरी गावी परतोडाला सुखरूप घेऊन आले.  यावेळी त्यांचे पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण, भाचे व कुटुंबातील लोकांना काही काळ विश्वासच बसत नव्हता कारण त्यांना शोधून शोधून सारे थकून गेले होते.  हयात आहे की नाही हीच चिंता होती पण तब्बल ९ वर्षांनंतर तो मनोरुग्ण जिवंत सुखरूप दिसल्या नंतर कुटुंबातील सदस्य व बहिणीला आनंद मावेसा झाला होता.  या आनंदात सारे कुटुंब गहिवरून गेले होते.  केरळ वरुन मदत कार्य करून त्या मनोरुग्ण इसमाला सुखरूप घरी सोडून दिल्या नंतर नातेवाईकांनी दिव्य गारुना सामाजिक संस्थाच्या सचिव एलिसा बर्थ व अजित तोमस यांनी बांधिलकी जपल्या बद्दल आभारही मानले होते.  तळेगाव श्या.पोलीस ठाण्यात मनोरुग्ण सापडलाची नोंद करण्यात आली.  यावेळी संस्थेचे एलिसा बर्थ, अजित तोमस, तळेगाव श्या. पोलीस अधीक्षक रवी राठोड, मुलगा रुपेश, मुलगी अलका सह नातेवाईक उपस्थित होते 
तुमचे वडील सापडले आहे हा फोन खणखणल्या नंतर काय आनंद घरच्यांना झाला असेल हे त्यांच्या कडून जाणल्या नंतर अत्यंत भावनिक प्रतिक्रिया मनोरुग्ण इसमाचा मुलगा रुपेश यांनी दिली.  आता त्यांना मनोरुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन त्यांचेवर आणखी योग्य पद्धतीने उपचार करून त्यांची प्रकुर्ती ठिक करण्याची धावपळ सुरू झाली आहे.  मात्र ९ वर्षा नंतर १००० किलोमीटरवर दूर केरळ येथे मनोरुग्ण सापडल्या नंतर परिवारात पुन्हा आनंद व्यक्त होत आहे.



  Print






News - Wardha | Posted : 2019-01-11






Related Photos