प्लांट बंद करून कामगारांना कामावरून कमी केलेल्या ग्रेस इंडस्ट्रीज मधील कामगारांना न्याय द्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
  दिवाळी बोनसची मागणी केल्याने २०० कामगारांना कमी करून ग्रेस इंडस्ट्रीज  ने  अन्याय केला आहे. यामुळे कामगार बेरोजगार झाले असून कामगारांना न्याय देण्यात यावा अशी मागणी कामगारांनी  उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 
  सहा वर्षांपूर्वी ग्रेस  इंडस्ट्रीज ताडाळी  मध्ये २०० कामगार काम करीत होते . परंतु दिवाळीच्या  बोनसची   मागणी केल्यानंतर सहा दिवस कंपनी बंद करून सर्व कामगारांना काढून टाकण्यात आले. नंतर १०० ते १२५ कामगारांना घेऊन कंपनी चालू कर्म्याट . उर्वरित ४० कामगार बाहेर ठेवण्यात आले . नंतर  ७ डिसेंबर २०१८ रोजी  उपजिल्हाधिकारी  चंद्रपूर यांच्या समक्ष जन परिषद ( जन  सुनावणी) घेऊन  सर्व कामगाराना   महिनाभरात कामावर रुजू करून घेवू असे  कंपनी मालक  व व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले. परंतु आजतागायत कामावर सामावून घेतले नाही. यामुळे  स्थानिक कामगार नेते  दिनेश चोखारे यांच्या अध्यक्षतेखाली  उपजिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना हरिशचंद्र पारखी व कामगार उपस्थित होते.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-11


Related Photos