१४ जानेवारीला गोंदिया जिल्हा नियोजन समितीची सभा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली १४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
सभेत सन २०१८ -१९ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व ओटीएसपी योजना इत्यादी योजनांचा माहे डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे. जिल्हा वार्षिक योजना सन २०१९ -२० प्रारुप आराखड्यास मान्यता प्रदान करणे. जिल्हा वार्षिक योजना सन २०१८ -१९ पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता प्रदान करणे. मागील १६ ऑगस्ट २०१८ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेचे इतिवृत्तास मंजूरी देणे व इतिवृत्तातील कार्यवाही मुद्यांचा आढावा घेणे. तसेच अध्यक्ष महोदयांचे परवानगीने वेळेवर येणाऱ्या इतर विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्यसभा व लोकसभा सदस्य, विधान परिषद व विधानसभा सदस्य, विदर्भ विकास मंडळाचे सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्ह्याचे पालक सचिव, विशेष निमंत्रित सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत.  Print


News - Gondia | Posted : 2019-01-11


Related Photos