महत्वाच्या बातम्या

 ग्रामपंचायतीसाठी नामनिर्देशनपत्र : दोन मेपर्यंत सादर करता येतील


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : साकोली तालुक्यातील उसगांव, उकारा, खांबा व बरडकिन्ही ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकासांठी  २५ एप्रिल ते २ मे दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागविण्यात व सादर करण्यात येणार आहे.


पोटनिवडणूक कार्यक्रमातील मुद्दा क्र. पाचमध्ये नमुद केल्याप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १०-१ अ (१) नुसार राखीव जागेसाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने नामनिर्देशनपत्राबरोबर सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेले जातीचे  प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहे.


सदर निवडणूकीत राखीव प्रवर्गातील जागेसाठी ज्या नागरिकांना निवडणूक लढवावयाची आहे. अशा नागरिकांनी नामनिर्देशनपत्राबरोबर किंवा छाननी पुर्वी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन तहसिलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी साकोली यांनी कळवले आहे.





  Print






News - Gondia




Related Photos