पालकमंत्र्यांच्या हस्ते ज्ञानगंगा अभ्यासिकेचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाविण्यपूर्ण उपक्रम ‘शोध क्षमतेचा,ग्रामीण ऊर्जेचा’ ही स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला सुरु करण्यात आलेली आहे. सदर व्याख्यानमालेअंतर्गत प्रत्येक महिन्यात दर शुक्रवारला तज्ञ वक्ते/अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येते. ‘शोध क्षमतेचा,ग्रामीण ऊर्जेचा’ स्पर्धा परीक्षा व्याख्यानमालेअंतर्गत ज्ञानगंगा अभ्यासिकेचे उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते ७ जानेवारीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे करण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य देवसुदन धारगावे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे निमित्ताने व्याख्यानमालेच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत घेण्यात आलेल्या मार्गदर्शन सत्राच्या स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखेडे यांनी केले. संचालन वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अंकेश केदार यांनी केले, उपस्थितांचे आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  Print


News - Gondia | Posted : 2019-01-11


Related Photos