भंडारा येथे शिलाई स्कुल प्रकल्पातंर्गत शिक्षीका प्रशिक्षण कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
ग्रामीण भागातील महिलांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने  उषा इंटरनॅशनल लिमीटेड व अफार्म पुणे यांच्या सयुक्त विद्यमाने शिलाई स्कुल प्रकल्पातंर्गत शिक्षीका प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन ८ ते १४ जानेवारी पर्यंत समता प्रशिक्षण सभागृह मेंंढा रोड भंडारा येथे करण्यात आले आहे.
शिवणकला आणि डे्रस डिझाईनमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील महिलांमध्ये कलागुण असुन सुद्धा माहितीचा अभाव आणि परिपुर्ण प्रशिक्षणाअभावी महिलांना संधीचा लाभ घेता येत नाही. ग्रामीण भागातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा आमचा मानस असल्याचे उषा इंटरनॅशनल लि. दिल्लीचे राज्य समन्वयक परेश नागपुरे यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना सांगीतले. यांच्या सोबतच कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणुन अफार्म पुणे कार्यक्रम व्यवस्थापक विनायक गारडे, तांत्रीक प्रशिक्षक राजेश हटवार, उषा इंटरनॅशनल लि. प्रशिक्षक गौरी जिवने यांचे कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभत आहे. 
या प्रशिक्षण कार्यक्रमात सविता ठाकरे, राजेगार, दर्शना मडावी खेडेपार, चंदा हनवटकर मोरगाव, टिकन पटले मासलमेटा, योगीता कटरे, भंडारा, स्मिाता बंसोड निलागोंदी, रजनी रामटेके गोंडसावरी, निलीमा टेंभुर्णे सालेभाटा आणि वैशाली रहांगडाले, मंजु कोटांगले या महिला सहभागी झाल्या आहेत. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामसागर संस्थेचे अध्यक्ष विशाल शेंडे, सचिव दिलीप बिसेन, संचालीका रुपाली बिसेन, ग्रामविकास संस्थेचे सदस्य किशोर ठवकर, प्रकल्प समन्वयक दिलहर बंसोड, मुकेश कटरे, अश्विन गजभिये प्रयत्नशिल आहेत.  Print


News - Bhandara | Posted : 2019-01-11


Related Photos