एसटीचा निर्णय : यापुढे कोणत्याही विभागातून अन्य विभागात बदली मिळणार नाही


-  उमेदवारांना भरून द्यावे लागणार  बदलीसाठी अर्ज  करणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
राज्य परिवहन महामंडळाने यापुढील भरतीसाठी एक मोठा बदल केला असून  यापुढे कोणत्याही विभागातून अन्य विभागात बदलीसाठी अर्ज सादर करणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र उमेदवारांना भरून द्यावे लागणार आहे. यापुढील सर्व जिल्हानिहाय भरतीच्या जाहिरातींमध्ये हा प्रतिज्ञापत्राचा मजकूर छापण्यात येणार आहे.  न्यायालयाच्या आदेशानुसार या सूचना दिल्याची माहिती  परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे. 
प्रत्येक जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. इतर जिल्ह्यातील उमेदवाराने नोकरीसाठी संबंधित जिल्ह्यातून अर्ज केल्यास हरकत नाही. मात्र आयुष्यभर त्या ठिकाणी नोकरी करायची तयारी संबंधित उमेदवारी ठेवावी. आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि कुठल्याही पुढाऱ्याने बदलीसाठी पत्र दिल्यास त्यावर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे भविष्यात बदल्यांवरून आणखी गोंधळ होणार नाही, असेही रावते यांनी सांगितले.    Print


News - Rajy | Posted : 2019-01-11


Related Photos