भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची उचलबांगडी


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :   भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे  सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची  CVC च्या नियमांनुसार  उचलबांगडी करण्यात आल्याचं केंद्रीयमंत्री अरूण जेटली यांनी म्हटले आहे.  सिलेक्ट समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
 आलोक वर्मा यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता तो अवघ्या चोवीस तासांचा ठरला आहे. आम्ही जरी आलोक वर्मांच्या बाजूने निर्णय दिला असला तरीही त्यांच्या पदाचे काय करायचे? याचा निर्णय हा सिलेक्ट कमिटीचा म्हणजेच निवड समितीचा असेल असेही कोर्टाने म्हटले होते. त्यानुसार आलोक वर्मा यांना कोर्टाने दिलेला दिलासा अवघा चोवीस तासांचा ठरला आहे. दोन विरूद्ध एक अशा मतांनी आलोक वर्मा यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.  त्यांच्या गैरहजेरीत आता एम. नागेश्वर राव ही जबाबदारी सांभाळतील अशी माहिती मिळते आहे. 
सीबीआयच्या संचालक पदावरून आलोक वर्मा यांची गच्छंती झाली आहे. त्यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यांची बदली नेमकी कोणत्या विभागात करण्यात आली आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र सीबीआयच्या संचालक पदावरून त्यांना हटवण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि जस्टिस ए. के. सिकरी यांच्या त्रिसदस्यीय समितीत दोन विरूद्ध एक असा निर्णय झाला. ज्या निर्णयानुसार आलोक वर्मा यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना पदावरून हटवण्यात येऊ नये असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले होते. मात्र खर्गे यांच्या मताच्या विरोधात वर्मा यांना पदावरून हटवण्यात यावं या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जस्टिस सिकरी ठाम राहिले त्यामुळे हा निर्णय २-१ असा घेण्यात आला.  Print


News - World | Posted : 2019-01-10


Related Photos