महत्वाच्या बातम्या

 हालेवारा : शासकीय योजनांच्या जत्रेत नागरिकांची गर्दी


- राजस्व अभियानात २ हजार ५४५ दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण

- हालेवारा येथे शासकीय योजनांची जत्रा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुका प्रशासनामार्फत हालेवारा येथे २४ एप्रिलला मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियान अंतर्गत शासकीय योजनांची जत्रा, महाराजास्व अभियान घेण्यात आले. या अभियानात एकूण २ हजार ५४५ दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी योजनांच्या जत्रेत नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली.

हालेवारा येथे झालेल्या महाराजस्व अभियानाचे उदघाटन जि.प. माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी येथील उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता होते. प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी मुकेश माहूर, नायब तहसीलदार पी.व्ही. चौधरी, नायब तहसीलदार जनक काडबाजीवार, नायब तहसीलदार भांडेकर, विशेष अतिथी म्हणून सरपंच वासुदेव गेडाम माजी सरपंच गणूजी मट्टामी, पोलीस पाटील डुटा मट्टामी, सनो नरोटी, आडवे कांदो, विलास कोवासे, येसो मट्टामी, चामरू उसेंडी आदी मान्यवर उपस्थित होते. 

हालेवारा येथील शासकीय आश्रम शाळेत घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियान शिबिरातून मान्यवरांनी नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन करतानाच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

महाराजस्व अभियानातून हालेवारा परिसरातील नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र, अधिवास शेतकरी प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, जॉब कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड असे तब्बल २ हजार ५४५ दाखले आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी हालेवारा, पुंनूर, पेटा, वटेगट्टा, बटेर, रेगादंडी, कोरणार, देवदा, मवेली, कोठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos