महत्वाच्या बातम्या

 प्रशासनानी आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी : जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायत कडून मंजुरी प्रदान केलेल्या आकृषिक आदेशानुसार नियमबाबी, अटीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी.

भ्रष्टाचार व नियमबाह्य झालेल्या कामांची चौकशी करण्यात यावी, असे अनेक मुद्दे घेवुन अहेरी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांनी ६-७ दिवसापासून अहेरी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असून प्रशासनाकडुन जर अशा समस्याचे निराकरण होत नसेल तर या जिल्ह्याचा विकास तरी होणार कधी अशी शंका व्यक्त करत यांबाबत प्रशासनानी दखल घेवून लवकरत लवकर उपोषणकर्त्याकडे भेट देऊन चौकशी करण्यात यावी. अन्यथा गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय आणि अहेरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय समोर मोठा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos