वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध विषयावर खा. रामदास तडस यांची विभागीय रेल्वे प्रबंधकांसोबत आढावा बैठक


-वर्धा रेल्वेस्थानकावरील विविध विकास कामांचा घेतला आढावा
-विभागीय रेल्वे प्रबधंक व खा . रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर यांचा संयुक्त पाहणी दौरा संपन्न 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  वर्धा :
वर्धा लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विभागाशी निगडीत विविध विषयावर आज वर्धा रेल्वेस्थानकावर विभागीय रेल्वे प्रबंधक, खासदार रामदास तडस, आमदार डाॅ. पंकज भोयर यांच्या संयुक्त पाहणी दौऱ्या दरम्यान सविस्तर चर्चा करण्यात आली. आज मध्य रेल्वेचे नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे प्रबधंक श्री. सोमेश कुमार वर्धा जिल्हयातील कार्यालयीन दौऱ्या वर आले असता वर्धा रेल्वे स्थानकावर बैठक संपन्न झाली.
 वर्धा लोकसभा क्षेत्रातील प्रामुख्याने नागपूर-भुसावळ पॅसेंजर ही रेल्वे गाडी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली असल्याने दैनदिन प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची समस्या लक्षात घेता ही गाडी तात्काळ पुर्ववत सुरु करावी अशी प्रमुख मागणी खासदार रामदास तडस यांनी उपस्थित अधिकारी वर्गासमोर केली. या सोबतच वर्धा रेल्वे स्थानक जागतीक दर्जाचे माॅडेल रेल्वे स्टेशन म्हणून प्रगतीपथावर असलेल्या विकास कामांचा आढावा, हिंगणघाट रेल्वे स्थानकवार उभारण्यात आलेल्या सुविधा, विविध रेल्वेस्थानकावरील रेल्वे थांबे व पायाभूत सुविधा, वर्धा-नांदेड नविन रेल्वेमार्ग, पुलगांव-आवी ब्राॅडगेज कार्य, आर्वी-वरुड मार्गाचे सर्वेक्षण, वरुड मोर्शी रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण व रेल्वे थांब्याविषयी आढावा, रेल्वे विभागाच्या माध्यमातून प्रगतीपथावर असलेल्या व पुर्ण झालेल्या विविध पायाभूत सुविधा यांची सविस्तर माहिती बैठकी दरम्यान रेल्वे विभागाच्या माध्यमातून देण्यात आली.
  खासदार रामदास तडस व आमदार डॉ. पंकज भोयर यांनी दिलेल्या विविध सुचनांवर रेल्वे विभागाच्या वतीने त्वरीत कार्यवाही करण्यात येईल व विकास कामे कालबध्द वेळेत पुर्ण करण्यात येतील असे रेल्वे विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
 या बैठकीकरिता भाजपा नेते जयंत कावळे, नगरसेवक कैलास राखडे, रेल्वे समितीचे सदस्य मदनसिंग चावरे, मिलींद भेंडे, डॉ. सुनिल चावरे व रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.  Print


News - Wardha | Posted : 2019-01-10


Related Photos